Your Own Digital Platform

रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी फायनल
फलटण: भारतीय जनता पार्टीची माढा मतदार संघाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणुक समितीने आज देशातील 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. मतदारसंघ कंसात तो मतदारसंघाचे राज्य व तेथील उमेदवार पुढीलप्रमाणे: माढा (महाराष्ट्र) - रणजितसिंह नाईक निंबाळकर, लडाख (जम्मू-काश्मिर) - जम्यांग त्सेरींग नामग्याल, चिक्कोडी (कर्नाटक) - अण्णासाहेब जोल्ले, रायचूर (कर्नाटक) - राजा अम्रेश नायक, कोप्पल (कर्नाटक) - संगन्ना कराडी, बालाघाट (मध्यप्रदेश) - ढलसिंघ बिसेन, राजगड (मध्यप्रदेश) - रोडमाल नगर, खारगोड (मध्यप्रदेश) - गजेंद्र पटेल, चुरु (राजस्थान) - राहूल कासवान, अल्वार (राजस्थान) - बलक नाथ, बंन्सवारा (राजस्थान) - कनकमल कटारा.