Your Own Digital Platform

विक्रम पावस्करांना भाजपाची उमेदवारी द्या

कार्यकारीणीच्या बैठकीत ठराव

स्थैर्य, सातारा
: सातार्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी असा ठराव एकमताने घेण्यात आला. तसेच तालुका कार्यकारिणीही याबाबत ठराव घेऊन प्रदेश कमिटीकडे पाठविणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

येथील विश्रामगृहावर गुरूवारी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, विजय साखरे, बबन कांबळे, विजय काटवटे, शहराध्यक्ष विकास गोसावी, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्वलकुमार काळे, सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, विठ्ठल बलशेटवार, गणेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानचे चर्चा झाल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सातार्‍याची निवडणूक लढविण्याची व त्याची उमेदवारी विक्रम पावसकर यांना देण्याविषयी ठराव करण्यात आला. याला सर्वांनीच एकमताने पाठिंबा दिला. तर याचवेळी पदाधिकाजयांनी जिल्ह्यातील पक्ष वाढीची माहिती दिली.

दरम्यान, महायुतीत पूर्वीपासून मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तरीही सध्या सातारा मतदारसंघ कोणाकडे राहणार हे निश्चित नाही. कारण, महायुतीतील सर्वांनीच निवडणूक लढविण्याची भाषा सुरू केली आहे. भाजपला मतदारसंघ मिळाला तर विक्रम पवासकर यांना उमेदवारी द्यावी. अन्यथा मतदारसंघ युतीतील दुसजया पक्षाला गेला तरी भाजप प्रामाणिकपणे व मनापासून काम करेल, असेही यावेळी ठरविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.