Your Own Digital Platform

श्रीराम कारखान्यानजिक अपघात विडणीतील माजी सैनिक जागीच ठार

स्थैर्य, फलटण: श्रीराम साखर कारखान्या समोर हायवा ट्रकने दुचाकी स्वारास पाठीमागून जोरावर धडक देऊन चिरडल्याने दुचाकी स्वार माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.

महाड पंढरपूर पालखी मार्गावर फलटण येथिल श्रीराम साखर कारखान्यासमोर टि.व्ही एस. एक्सल गाडी क्रं- चक-11-Aढ-5896 या दुचाकी वरुन मार्केट कमिटीतून बाजरी घेऊन विडणी (दहाबिघे) येथे घराकडे चाललेल्या दुचाकी स्वारस पाठीमागून डांबरीकरणाची खडी घेऊन आलेल्या हायवा ट्रक क्रं. चक11Aङ8200 या गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार माजी सैनिक विनायक आकोबा शिंदे वय 75 विडणी (दहाबिघे) यांच्या डोक्यावरून हायवा ट्रकचे चाक गेल्याने डोक्याच्या पूर्ण चिंद्या झाल्याने जागीच मृत्यू झाला.

हाय ट्रक चालक गाडी सोडून फरार झाला असून या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिस ठाणेत प्रेमजीत अभंग यांनी दिली असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करणेत आला असून अधिक तपास पोलिस अधिकारी करीत आहे.

दरम्यान, विनायक शिंदे यांनी इंडिअन आर्मीत वीस वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत झाल्यानंतर त्यांनी विडणी येथे शेती व्यवसाय करत होते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला.विनायक शिदे यांच्या पश्च्यात पत्नी दोन मुले एक मुलगी सूना नातवंडे असा परीवार आहे.