Your Own Digital Platform

तालुका पोलीस ठाण्यात उदयनराजे आल्याने खळबळस्थैर्य, सातारा: सुरूची धुमश्चक्री प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामिन मंजूर केलेले खासदार उदयनराजे भोसले याज कायदेशीर जामिनाच्या प्रक्रीयेसाठी आज तालुका पोलिस ठाण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची अटक व जामिनावर सुटका करण्यात आली.दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यात खासदार श्रीमंत छत्रपती आल्याने शहरात खळबळ माजली होती.

आनेवाडी टोलनाक्याचा ताबा घेण्याच्या कारणावरुन गेल्यावर्षी कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्यात सुरुची बंगल्यासमोर राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाकडून तसेच पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्रपणे अधिकारी नेमण्यात आले होते. या गुन्ह्यांचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर उदयनराजे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला होता. या संदर्भातील कायदेशीर प्रक्रीया पार पाडण्यासाठी उदयनराजे आज तालुका पोलिस ठाण्यात आले होते. या वेळी उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे उपस्थित होते. या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अटक व सुटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.

त्यानंतर उदयनराजे तेथून निघून गेले.