Your Own Digital Platform

दोघांची आत्महत्या

स्थैर्य, म्हसवड : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वेगवेगळ्या घटनेत एका महिलेने व एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

विरळी येथील विवाहिता सौ. सुमन संजय गोरड (वय 30) हिने विरळी गावच्या हद्दीत बामणाचा मळा येथील शिवारात राहत्या घरी लोंखंडी अँगलला साडी बांधून गळफास दिनांक 3 मार्च रोजी सांयकाळी 6 च्या सुमारास घेतल्याची खबर पती संजय शिवराम गोरड यांनी म्हसवड पोलिसात दिली असुन तपास पोलीस हवलदार आशोक कांबळे करत आहेत. दुसर्‍या एका घटनेत ज्ञानदेव भिकू खैरमोडे वय 23 रांजणी ता.माण याने म्हसवड येथे कामास जातो म्हणून मेव्हणे व बहिण यांना विचारुन दिनांक 3 मार्च रोजी नेहमी प्रमाणे सांयकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घरातुन गेला. आम्ही जेवण करुन झोपी गेलो. सकाळी 7.30 च्या दरम्यान लोकांनी मला सांगितले, तुमचे मेव्हणे ज्ञानदेव खैरमोडे यांनी पळशी येथील माळीखोरा परिसरातील मोडका महादेव मंदिरा जवळील पिंपरणीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगीतले. मी तात्काळ तेथे गेलो व पाहिले असता माझे मेव्हणे ज्ञानदेव खैरमोडे यांंनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आल्या नंतर बाबत माहिती म्हसवड पोलिसात दिली असुन याचा तपास सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करीत आहेत.