Your Own Digital Platform

सुरुची ु जलमंदिर भडका पुन्हा उडणार?
स्थैर्य, सातारा: विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी परवा सोमवार (दि. 4) रोजी कल्याण रिसॉर्ट येथे घेतलेल्या बैठकीनंतर काल मंगळवार (दि. 5) रोजी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम आपण करणार नाही. वेळप्रसंगी याबाबत राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवारांनाही सांगणार आहोत, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सुरुची ु जलमंदिर भडका पुन्हा एकदा उडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या समर्थकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवार (दि. 5) रोजी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी बैठक घेतली.

यावेळी जेष्ठ नगरसेवक अशोक मोने, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील, रवि ढोणे, नगरसेविका दिपलक्ष्मी नाईक, लिना गोरे, मनिषा काळोखे, सोनाली नलवडे, बाळासाहेब खंदारे, माजी नगरसेवक हेमंत कासार, प्रकाश बडेकर, महेश जगताप, विजय तारू, रवि माने, हर्षल चिकणे, अतुल चव्हाण, जगन्नाथ किर्दत, शरद गायकवाड, नाना इंदलकर, महेश राजेमहाडीक, जर्नादन पिंटू जगदाळे, सुनिल जाधव, नासीर शेख, भालचंद्र निकम, अशोक जाधव, सचिन कांबळे, बलभिम शिंगरे, गणेश भोसले, बबलू सोलंकी, जयंत राऊत यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

जेष्ठ नगरसेवक अशोक मोने म्हणाले, नेते शिवेंद्रसिंहराजे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश मानून गेल्या दोन निवडणुकांमध्ये नगर विकास आघाडीच्या आजी, माजी नगरसेवकांनी प्रामाणिकपणे कामे केली. त्यांची निवडणुक पार पडली की, खासदारांची भुमिका ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशीच आजपर्यंत राहिली आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. खा. शरद पवारांनी उदयनराजेंच्या उमदेवारीचा विचार करू नये. तसे घडल्यास शहरातील नगर विकास आघाडीचे आजी, माजी नगरसेवकांचा कायम विरोध राहिल.

नगरसेवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, मिसळीचा कट लाल असतो, त्याप्रमाणे आमची सगळ्यांची डोकी भडकली आहेत. गोडोलीकरांनी त्यांना मिसळीचा कट कसा असतो, याचा नमुना दोन वर्षापुर्वीच दाखविला आहे. त्यामुळे त्यांचा काय परीणाम झाला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे, असा टोला नगरसेवक बनकर यांचे नाव न घेता लगावला.

माजी नगरसेकव जयेंद्र चव्हाण म्हणाले, नगर पालिका निवडणुकीवेळी मी उभा असताना उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यावेळी माझ्या विरोधात वार्डामध्ये 42 मिटींगा व पाच पदयात्रा घेवून तसेच दहशवादाचा अवलंब करून विरोधी प्रचार केला. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसले नाहीत का? या निवडणुकीत माझा व वैयक्तीक माझ्या कार्यकर्त्यांचा पूर्ण त्यांना विरोध हा कायम रहाणार आहे. जर खासदरच पक्षविरोधी कारवाया करत असेतर सामान्य पदाधिकार्यांनी खासदार विरोधी काम केले तर कुठे बिघडले. हीच भुमिका मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यापुढे मांडली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला विचारात घेतल्याशिवास कोणता निर्णय घेतला जाणार नाही असे सांगीतले आहे.

लोकसभेच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थकांची बैठक सोमवार (दि. 4) रोजी झाली होती. या बैठकीत खासदार समर्थकांनी विधानसभेला तुमची वेळ येईल त्यावेळी जागा दाखवून दिली जाईल असा इशारा दिला. यावर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीमधील आजी, माजी नगरसेवक, आणि पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत उदयनराजेेंचा प्रचार न करण्याचा इशारा देण्यात आला.