Your Own Digital Platform

नांदलापूर नजिक टाटा सुमोचा भीषण अपघात


स्थैर्य: कराड: आशियाई महामार्गावर नांदलापूर (ता. कराड) जवळ बोलेरो आणि टाटा सुमो चा अपघात झाल्याने सुमारे दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमी जयसिंगपूर येथील असल्याचे समजते. अपघात रात्री उशिरा झाल्याने अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत. जखमींना उपचारासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.