Your Own Digital Platform

मुधोजी प्राथमिकचा भावसुमनांजली हा कार्यक्रम आकाशवणीवर सादर
स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण च्या विद्यार्थ्यांचा ग.दि.माडगूळकर जन्मशताब्दी वर्ष श्री.सुधिर फडके निमित्त गदिमा लिखित गीत रामायण व बालगीतांचा भावसुमनांजली हा कार्यक्रम दि.22/02/2019 आकाशवणी पुणे येथे बालोद्याान या कार्यक्रमात सादर करण्यात आला.

या कार्यक्रमात गीत रामायणातील दोन गीते 1) स्वयें श्रीरामप्रभु ऐकती 2)रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण व बाल गीत ‘बिन भिंतीची उघडी शाळा‘ हे वर्ष गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा व सुधीर फडके म्हणजेच बाबुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.हेच निमित्त साधून आम्ही त्यांना भावसुमनांजली वाहत आहोत. गदिमा हे विख्यात कवी होते.त्यांना ‘आधुनिक वाल्मिकी ‘ अशी उपाधी दिली आहे.त्यांनी गीत रामायण ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांना दिली आहे.

फलटण श्रीराम हे ग्रामदैवत आहे.फलटण संस्थानच्या नाईक निंबाळकर घराण्याचे कुलदैवत आहे.व सौभग्याने या मंदिरा शेजारीच आमची मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा आहे. तसेच थोर गायक संगीतकार श्री.सुधिर फडके यांची ही जन्मशताब्दी या वर्षी आहे.गायक संगीतकार म्हणून गीत रामायणातील त्यांची भुमिका मध्यवर्ती राहिली आहे.त्यांना ही या निमित्ताने आम्ही आदरांजली वाहत आहोत.

या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला रणवरे , श्रीमती जयश्री कदम ,श्री रूपेश शिंदे श्री विलास साबळे , श्रीमती वैशाली नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाची संकलपना व लेखन श्री पी.एम.काळे सर यांनी केले.

कार्यक्रमात कु.श्रेया पोतदार ,हंसिनी जगताप, शिफा आतार,अनुष्का मठपती,सिाक्षा भोये, सफा तांबेळी,मानसी पवार,वैष्णवी शेंडे,अक्षरा गांधी,गीत महाजन ,अनुष्का शिंदे,शिफा मुलाणी,जान्हवी मर्दाने ऋतुजा जाधव सई पलंगे यांनी गायन केले.त्यांना संवादिनीवर कु.श्रध्दा किरकिरे यांनी व तबल्यावर श्री.रूपेश शिंदे यांनी साथ दिली.

कार्यक्रमाचे निवेदन चि.हरिष बिरादार याने केले.या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शनिवार दि. 02/03/2019 रोजी 378.28 एम व 792 किलोहर्ट वर सादर करण्यात आले.