Your Own Digital Platform

खून करुन मृतदेह जाळला;

स्थैर्य, सातारा: अटक केलेल्या आरोपींच्या समवेत पोलीस अधिकारी.


सहा तासात गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीसांना यश

स्थैर्य, सातारा
: लक्ष्मीटेकडी (सातारा) येथील मंदार उर्फ बबलु प्रदिप नगरकर (वय 30) यांच्या डोक्यात दगड घालून चाहूर फाटा पिरवाडी येथे खून करून जाळून जाळून टाकल्याचा खळबळजनक प्रकार सकाळी उघडकीस आला. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस केला असून या खून प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहेत. या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुन्हेगारी जगतात स्वत:चे नाव करण्यासाठी शुल्लक भांडणाच्या कारणावरून लक्ष्मीटेकडी येथील युवकाचा खून करण्यात आल्याचे व या साठी छज उजचझठAचखडए जछङध ढकजघए असा थहरीं’ी ररि ग्रुप तयार केला असल्याची माहीती आरोपींनी प्राथमिक तपासात दिल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

अमिर इम्तियाज मुजावर वय 20, अनुप इंद्रपाल कुरेल वय 19, अनिकेत बाळासाहेब माने वय 20 व दोन अल्पवयीन( सर्व रा. पिरवाडी ता.जि.सातारा ) अशी खून प्रकरणात अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दि. 4 मार्च रोजी पिरवाडी चाहूर फाटा सातारा येथे अनोळखी युवकाचा खून करून अर्धवट जळलेला मृतदेह असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. हि माहीती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिस व स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील,डी वाय एस पी राजेंद्र साळुंखे यानी भेट देवून तपासी पथकाला तपासा बाबत सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत मयत मंदार ऊर्फ बबलु प्रदिप नगरकर रा. लक्ष्मीटेकडी येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक माहीती घेतली असता मयत मंदार हा बाँम्बे रेस्टाँरंट येथे बियर पिण्याकरता गेला होता असे समोर आले. या वेळी पोलिसांनी बाँम्बे रेस्टाँरट येथील बियर शाँपी मध्ये माहिती घेतली असता मयत मंदार याचे या परीसरातील पाच ते सहा युवकांबरोबर शुल्लक कारणावरून भांडण झाले असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ तपास करत या प्रकरणी पिरवाडी येथील अमिर इम्तियाज मुजावर वय 20, अनुप इंद्रपाल कुरेल वय 19, अनिकेत बाळासाहेब माने वय 20 व दोन अल्पवयीन मुले यांना ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता या सर्व आरोपींनी खूनाची कबूली दिली. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या युवकांनी शुल्लक कारणावरून युवकाचा खून केल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

या कारवाईत जिल्हा पोलिस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील,डी वाय एस पी राजेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विजय कुंभार, पोलिस उपनिरिक्षक प्रसन्न जर्‍हाड पो.हवा. विजय शिर्के , उत्तम दबडे,आंनदराव भोईटे,कांतीलाल नवघणे,संतोष पवार पो.ना.विजय कांबळे,शरद बेबले,प्रविण फडतरे,नितीन गोगावले,पो.काँ.विशाल पवार,गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.