Your Own Digital Platform

मदनदादा भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित

स्थैर्य, सातारा: किसन वीरचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर जवळजवळ निश्चित झाला असून दि. 9 मार्च रोजी भुईंज येथील किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या डिस्टीलरीचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्यातच मदनदादांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावरचा दबाव वाढवला गेला आहे. त्यामुळे दि. 9 रोजीचा मुहूर्त साधला जाईल, अशाच सध्याच्या हालचाली सुरु आहेत.