Your Own Digital Platform

दि.23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 दरम्यान मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी


पदवीधर-शिक्षक मतदार संघाकरिता

स्थैर्य, पुणे: भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि. 6 नोव्हेंबर2019 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2019 ते दिनांक 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्या नंतर निरंतर मतदार नोंदणी चालु राहणार असून त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहीत कार्यपध्दतीनुसार निकाली काढण्यास पात्र असलेले सर्व दावे निकाली काढुन पात्र मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत, असे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.