स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराचे दि.30 रोजी आसू येथे वितरण


स्थैर्य, फलटण : राष्ट्रबंधू शहिद राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथीदिना निमित देश प्रेमवार काव्य लेखन स्पर्धा माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा व प्रकाशित पुस्तक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धांच्या निमिताने विजेत्या स्पर्धकास ’स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2019 गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

पुरस्कार वितरण व संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसू, ता. फलटण, जि. सातारा येथे शनिवार दि.30 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काव्य लेखनात निंबा पुना बडगुजर एरंडोल जि. जळगाव यांची ’कारगीलचा इतिहास प्रथम, सौ. निलम मोहन बाजी मोहिते, मोळ,ता. खटाव यांची ’पावन भूमी’ द्वितीय, कु. वैष्णवी रावसाहेब वाणी कन्या विद्यालय शिर्डी यांची,’भारत माता’ तृतीय, आणि कु. सानिया पिरमहमद मनियार कन्या विद्यालय शिर्डी व कु. साक्षी तानाजी भिवरकर श्रीमान धन्यकुमार गांधी विद्यालय धुळदेव ता. फलटण यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे. 

निबंध स्पर्धेत सौ. अंजली शशिकांत गोडसे, सातारा प्रथम, सौ. सिमा सुरेश पार्टे, जिल्हा परिषद शाळा महू, ता. जावली जि. सातारा द्वितीय, सौ. सिमा शिरीष गांधी पुणे तृतीय, आणि कु. अक्षदा सुनिल कोते व कु.आरती जनार्दन वाकचौरे कन्या विद्यालय शिर्डी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.
 
प्रकाशित पुस्तक काव्य विभागात डॉ. सिमा आनंद बारामती स्वप्न फुले प्रथम, ज्ञानेश्वर बडवे, शिखर शिंगणापूर पुष्प राशी द्वितीय, विद्या सरपाते पोलीस पाटील गुंजखेड लोणार गावगाडा’ व ओंकार राठोड वडगाव गाढवे यवतमाळ बालहर्ष तृतीय क्रमांक देण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे. 

प्रकाशित पुस्तक विभागात शिवाजीराव जाधव, मार्डी ता. माण झुंज प्रथम, ताराचंद आवळे फलटण ’संघर्ष’ द्वितीय, सिराज बाबालाल मोमिन कराड ’कर्मवीर’ तृतीय क्रमांक देण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी संपन्न होणार्या ’स्वदेशी साहित्य संमेलनात’ विजेत्या स्पर्धकाना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार 2019 देवून गौरवण्यात येणार असून या स्पर्धेत व संमेलनात सहभागी होणार्या साहित्यिक यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. तरी सर्व साहित्यीक यांनी कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन प्रकाश सकुंडे गुरुजी यांनी केली आहे. संपर्कासाठी भ्रमनध्वनी 9881037491 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.