Your Own Digital Platform

स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराचे दि.30 रोजी वितरण


राष्ट्रबंधू शहिद राजीवभाई दिक्षीत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ


स्थैर्य, फलटण : राष्ट्रबंधू शहिद राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित देश प्रेमावर आधारित काव्य लेखन स्पर्धा आणि ’माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा व प्रकाशित पुस्तक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धांच्या निमिताने विजेत्या स्पर्धकास ’स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देवून मान्यवरांचे हस्ते शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2019 रोजी आसू ता. फलटण येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
 
पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद प्रा. शाळा, आसू ता. फलटण येथे शनिवार दि.30 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले असून. काव्य लेखन स्पर्धेत निंबा पुना बडगुजर एरंडोल जि. जळगाव यांची कारगीलचा इतिहास प्रथम, सौ. निलम मोहन बाजी मोहिते, मोळ, ता. खटाव यांची ’पावन भूमी’ द्वितीय, कु. वैष्णवी रावसाहेब वाणी कन्या विद्यालय शिर्डी यांची ’भारत माता’ तृतीय, आणि कु. सानिया पिरमहंमद मणियार कन्या विद्यालय शिर्डी व कु. साक्षी तानाजी भिवरकर श्रीमान धन्यकुमार गांधी विद्यालय धुळदेव ता. फलटण यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे.

निबंध स्पर्धेत सौ. अंजली शशिकांत गोडसे सातारा प्रथम, सौ. सिमा सुरेश पार्टे जिल्हा परिषद प्रा. शाळा महू ता. जावली जि. सातारा द्वितीय, सौ. सिमा शिरीष गांधी पुणे तृतीय आणि कु. अक्षदा सुनिल कोते व कु.आरती जनार्दन वाकचौरे कन्या विद्यालय शिर्डी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले आहेत.

प्रकाशित पुस्तक काव्य विभागात डॉ. सिमा आनंद बारामती ’स्वप्न फुले’ प्रथम, ज्ञानेश्वर बडवे शिखर शिंगणापूर ’पुष्प राशी’ द्वितीय, विद्या सरतापे पोलीस पाटील गुंजखेड लोणार गावगाडा व ओंकार राठोड वडगाव गाढवे यवतमाळ ’बालहर्ष’ यांना तृतीय क्रमांक देण्यात आले आहेत.

प्रकाशित पुस्तक विभागात शिवाजीराव जाधव मार्डी ता. माण ’झुंज’ प्रथम, ताराचंद आवळे फलटण ’संघर्ष’ द्वितीय, सिराज बाबालाल मोमीन कराड ’कर्मवीर’ तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.

राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथीदिनी संपन्न होणार्या ’स्वदेशी साहित्य संमेलनामध्ये’ विजेत्या स्पर्धकांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार 2019 देवून गौरविण्यात येणार असून या स्पर्धेत व संमेलनात सहभागी झालेल्या साहित्यिकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

सर्व साहित्यिकांनी या कार्यक्रमात सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश सकुंडे गुरुजी यांनी केले आहे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी 9881037491 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.