Your Own Digital Platform

कलम 370 वर बुधवारी परिसंवाद


स्थैर्य, सातारा: देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय असलेले जम्मू काश्मीर राज्यातील 370 कलम रद्द करण्यात आले आहे. याविषयावर देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहेत. यावर जेष्ठ पत्रकार अरविंद गोखले व वासुदेव कुलकर्णी यांनी कलम 370 + 35 अ हे पुस्तक लिहिले आहे. या ज्वलंत विषयावरील पुस्तकावर सातारा येथे परिसंवाद आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती - झुटिंग यांनी दिली.

बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये सायंकाळी सहा वाजता होणार्‍या या परिसंवादात जेष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर , इतिहासाचे अभ्यासक विश्वास दांडेकर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके , पुस्तकाचे लेखक व पत्रकार वासुदेव कुलकर्णी हे सहभागी होवून विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम शेठ असतील.