Your Own Digital Platform

खंडाळा नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे; कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची गरजस्थैर्य, खंडाळा : खंडाळा येथील नगरपंचायतीचा कारभार गत सहा महिन्यांपासुन प्रभारी मुख्याधिकारी यांच्यावर चालला असुन नगरपंचायतीस कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी खंडाळा येथे कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणुक प्रशासनाने करावी अशी मागणी जनतेमधुन होत आहे.

गत तीन वर्षापुर्वी खंडाळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. यानंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची तातडिने नेमणुक झाल्याने विकास प्रक्रिया गतीमान झाली होती. विविध योजनांमधील सहभाग, रस्ते, पथदिवे, गटारे यासारखी कामे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी तातडिने मार्गी लागल्याने खंडाळावासियांकडुन समाधान व्यक्त होत होते. परंतु गत सहा महिन्यापुर्वी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची बदली इतरत्र झाली आणि नगरपंचायतीचा कारभार सातारा येथील प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे . संबधीत अधिकाऱ्यांना दोन ठिकाणचा कारभार हाकावा लागत असल्याने ते खंडाळा येथे महिन्यातुन दोन ते तीन वेळा उपस्थित असतात. यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असुन प्रशासकिय कामकाजात दिरंगाई निर्माण झाली आहे. घरबांधणी परवाना, जन्म -मृत्य नोंदि, मंजुर कामांची तातडिने अंमलबजावणी, स्वच्छता यासह जनतेच्या अनेक कामांचा चांगलाच बोऱ्या उडाला आहे. प्रभारी मुख्याधिकारी असल्याने रामभरोसे चाललेल्या कारभाराने त्रस्त जनता नविन कारभाऱ्याची मागणी करू लागली आहे. दरम्यान खंडाळा नगरपंचायतीवर सद्यस्थितीमध्ये भाजपाचे वर्चस्व असुन गत दोन वर्षात सत्ताधारी व विरोधकामध्ये सत्तेच्या राजकारणात अतिशय जागृतता दाखवित राजकारणाची फोडाफोडीने शेवटची पायरी गाठली गेली. परंतु कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांच्या मागणीसाठी ती जागृकता सत्ताधारी व विरोधकांनी स्विकारलेली नाहि. सत्ताधारी आहे त्या स्थितीत प्रशासकिय कामकाज हाकुन जनलेला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत तर विरोधक हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेउन चाललेल्या कारभाराच्या गमती -जमती बघण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे ज्या जनतेच्या जीवावर सत्तेची फळे राजकारणी चाखत आहेत त्याच जनतेचे नगरसेकांना काहि घेणे -देणे नाहि का?याचबरोबर जनतेविषयी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या भावना बोथट झाल्या काय? असे एक ना अनेक सवाल खंडाळावासिय जनतेमध्ये निर्माण होउ लागले आहेत. दरम्यान गत एक वर्षापुर्वी स्वच्छता अभियानासाठी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जनतेमध्ये जागृतका निर्माण केल्याने खंडाळा शहराचा चेहरामोहरा बदलला होता परंतु यशाने थोडक्यात हुलकावणी दिली होती ती कमी या वर्षी भरुन काढण्यासाठी खंडाळावासिय सज्ज असुन प्रशासन कायमस्वरूपी अधिकारी देउन साथ देणार का याविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे.


खंडाळा नगरपंचायतीस कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची गरजच
खंडाळा नगरपंचायतीचा कारभार सहा महिन्यापासुन प्रभारी मुख्याधिकाऱ्यामार्फत सुरू आहे. संबधीत अधिकाऱ्यांकडे सातारा शहराचा कारभार असल्याने ते महिन्यातुन दोन ते तीन वेळा खंडाळा येथे उपस्थित असतात. परंतु यामुळे जनतेला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.जनतेचे होणारे हाल लक्षात घेउन प्रशासनाने खंडाळा येथे नुतन कायम स्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणुक करणे गरजेचे ठरले आहे. तरी हि नेमणुक तातडिने व्हावी यासाठी नगरपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.
प्रल्हाद खंडागळे,नगराध्यक्ष, नगरपंचायत खंडाळा.