क्रुझरच्या धडकेत तरडगावचा युवक ठार


स्थैर्य, फलटण : नीरा लोणंद रस्त्यावर पाडेगाव ता. खंडाळा हद्दीत क्रुझर जीप व अ‍ॅक्टिवा स्कूटर यांच्यात झालेल्या धडकेमध्ये एक जण ठार झाला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जीप आणि स्कूटर यांची धडक होऊन स्कूटर वरील गणेश बबन आवारे (वय 30 रा.तरडगाव ता.फलटण) हा युवक ठार झाला आहे. क्रुझर जीप चालकाच्या विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडेगाव पाटीजवळ गणेश आवारे स्कूटरवरून जात असताना समोरून वेगात आलेल्या क्रूजर ने जोरात धडक दिल्याने गणेश चा रस्त्याच्या कडेला पडून मृत्यू झाला आहे.

No comments

Powered by Blogger.