Your Own Digital Platform

नागरिकांनी नगर परिषदेच्या संकलीत कराची रक्कम भरू नये: अ‍ॅड.नरसिंह निकम


स्थैर्य, फलटण : फलटण नगर परिषदेने शहरातील नागरीकांना पुन्हा वाढीव संकलीत कराच्या नोटीसा पाठविल्या आहेत . सदरच्या नोटीसी या बेकायदेशीर असून अन्यायकारक आहेत असे अँड . नरसिंह निकम यांनी सांगितले . वास्तविक या आधी सन 2017 - 2018 सालामध्ये फलटण नगर पालिकेने शहरातील घर मिळकतींचे चुकीचे व बेकायदेशीररित्या खाजगी ठेकेदाराकडून मुल्यांकन करून त्यावर संकलीत कराची भरमसाठ आकारणी केली होती . ती आकारणी पूर्णपणे चुकीची व बेकायदेशीर अशी होती , अशा अन्यायकारक संकलीत कर वाढी विरोधात दि . 12 / 12 / 2018 रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे अ‍ॅड . नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय धरणे आंदोलन झाले होते . त्या धरणे आंदोलनाच्या दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र देवून झालेली संकलीत कराची वाढ ही अयोग्य व चुकीची आहे असे लेखी दिले व कोणतीही करवाढ न करता सन 2015 - 2016 या सालात निश्चित केलेल्या संकलीत कराप्रमाणे नगरपालिका कर घेईन असे लेखी आश्वासन दिले होते . त्याचबरोबर वाढीव संकलीत कराच्या आलेल्या नोटीसीविरुध्द अपीले दाखल करावीत . त्या अपीलांवर निर्णय घेऊन अन्यायकारक कर वाढ रद्द करू असे लेखी आश्वासन दि . 12 / 12 / 2018 रोजी मुख्याधिकारी यांनी दिले होते . त्यावर शहरातील नागरीकांनी पाच हजारापेक्षा जास्त अपीले दाखल केली होती . त्या अपीलांवर अद्याप कोणताही निर्णय न देता पुन्हा संकलीत कराच्या नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत . त्याचप्रमाणे मुख्याधिकारी यांनी कायद्यातील तरतुदीनुसार दाखल केलेली अपीले ही नगरपालिका अ‍ॅक्ट कलम 169 प्रमाणे जिल्हाधिकारी , नगराध्यक्ष , विषय समितीचे अध्यक्ष , विरोधी पक्षनेते , नगररचना अधिकारी यांच्या समिती पुढे ठेवून सदर समितीने हा अन्यायकारक कर रद्द करणे कायद्याने आवश्यक असताना सुध्दा अशा प्रकारची कोणतीही कायदेशीर पाऊले नगर परिषदेकडून उचलली गेली नाहीत . विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नगर परिषदेच्या सत्ताधार्‍यांनी शहरातील मतदारांनी विरोधी मतदान केले म्हणून त्याचा राग मनात धरुन पुन्हा सर्व कायदेशीर बाबींना फाटा देवून संकलीत कराच्या नोटीसा पाठविलेल्या आहेत . . . वास्तविक शहरातील दुरावस्था पाहता शहरातील नागरीकांना रस्ते नाहीत . शुध्द पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होत नाही , आरोग्याच्या बाबतीत डेंग्युने संपूर्ण फलटण शहर आजारी पडले असून बरेच नागरीक डेंग्युने मरण पावलेले आहेत . त्याचबरोबर आरोग्याचा गंभीर प्रश्न फलटण शहरासमोर उभा राहीलेला आहे . नगर परिषदेने कोणत्याही मुलभूत सुविधा न देताच पुन्हा अशी अन्यायकारक व बेकायदेशीर संकलीत कराच्या नोटीसा पाठविलेल्या आहेत व नागरीकांवर भुर्दड लादला आहे . त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या अन्यायकारक संकलीत कराच्या संदर्भात मिळकत धारकांनी केलेल्या सर्व अपीलांचा निकाल व संकलीत कराचे हे प्रकरण कलम 169 प्रमाणे समितीकडे पाठवून समितीने ही अन्यायकारक व बेकायदेशीर संकलीत कर वाढ रद्द करावी . जोपर्यंत सदर समिती हा अन्यायकारक कर रद्द करत नाही , तोपर्यंत कोणतीही कर वसुलीच्या नोटीसा अगर कर वसुली नगर परिषदेने करू नये . अन्यथा नगर परिषदे विरुध्द या अन्यायकारक कर वाढीविरुध्द धरणे , रास्ता रोको , उपोषण , अमरण उपोषण , असहकार इत्यादी प्रकारचे लोकशाही मागनि आंदोलन करावे लागेल . अशा प्रकारचे निवेदन दि . 28 / 11 / 2019 रोजी नगर परिषदेला दिलेले आहे . सदर निवेदनावर नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर , गटनेते नगरसेवक श्री . अशोकराव जाधव , नगरसेवक श्री . सचिन अहिवळे , श्री . सचिन बेडके , नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर , सौ . मदलसा कुंभार , सौ . मिना नेवसे , सौ . रश्मी नाईक निंबाळकर , सौ . ज्योती खरात , श्री . धनंजय महामुलकर , श्री . सुशांत निंबाळकर , श्री . रविंद्र फडतरे , श्री . नितीन यादव , श्री . राजेश हेंद्रे , श्री . स्वप्नील मुळीक , श्री . प्रदीप झणझणे , मनसेचे श्री . युवराज शिंदे यांच्या सह्या आहेत . नागरीकांनी जोपर्यंत नगर परिषद अन्यायकारक कर वाढ रद्द करत नाही , तोपर्यंत कोणीही संकलीत करू भरू नयेत असे आवाहन फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड . नरसिंह निकम यांनी नागरीकांना केले आहे .