Your Own Digital Platform

शेतकर्‍यांचे सात बारा कोरे होणारच -ननावरे

स्थैर्य, सातारा : पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना शिवसैनिक

स्थैर्य, सातारा: सातारा तालुका व शहर शिवसेना आणि शेतकरी बांधवांच्या वतीने सातारा तहसीलदारांना राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीची भरपाई शासनाने तातड़ीने शेतक-यांना द्यावी, भरपाईची रक्कम वाढवून मिळावी व सातबारा कोरा करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.शेतकर्‍याच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मान्यवर खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे सात बारा कोरे होणाराच असा विश्वास शिवसेना सातारा तालुका प्रमुख आतिष ननावरे यांनी यावेळी व्यक्त केला. 

सातारा येथे पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जेष्ठ मार्गदर्शक शिवसैनिक अण्णा देशपांडे,सचिन मोहिते याच्या हास्ते पुष्पमाळ घालून तेथून सातारा तहसीलदार कार्यालयात शिवसैनिकांनी जयघोषात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख ननावरे,उप तालुका प्रमुख अनिल गुजर यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. शिवसेना संपर्क प्रमुख दगडू सपकाळ, उपनेते नितीन बानूगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
 
सध्या महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभी आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माण-खटाव भागात युवा नेते शेखर गोरे व शिवसैनिकांनी शिवसेना मदत केंद्र सुरू केले आहे.तसे मदत केंद्र सातारा जिल्ह्यातील अन्य भागात करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हणमंतराव चवरे यांनी सांगितले आहे.
 
यावेळी निमिश शहा ,शिवाजी सावंत नंदू केसरकर उ ता प्र, मारूती वाघमारे ,सयाजी शिंदे ,निलेश मोरे ,शिवाजी इंगवले , मेजर रविंद्र शळके , उज्वला शेड़गे , सौ मिनल शहा, सौ वर्षा कांबळे , सौ सारिका सुळे ,सुनील भोसले , नितीन लकेरी , संतोष निगड़कर , राजू नाईक, गणेश कुड़वे , प्रविण माने , अर्जुन कदम , सागर रायते , मोहित शहा , पंकज मोहिते , अजय सावंत व शिवसेनेचे पदाधिकारी,शेतकरी कार्यकर्ते आणि बहुसंख्येने उपस्थित होते.