Your Own Digital Platform

वडापच्या कारणावरून राजवाडा येथे एकावर चाकूने वारहल्लेखोर स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर


स्थैर्य, सातारा : वडाप जीप लावण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकाने दुसर्‍या जीप चालकावर चाकूने वार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पंचपाळी हौद, राजवाडा येथे घडली. दरम्यान, हल्लेखोर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, की अरुण गजानन मोरे (वय 34) रा. कारी, ता. सातारा सध्या राहणार मंगळवार पेठ सातारा हा युवक वडापचा व्यवसायक करतो. सातारा येथून परळी आणि परळी ते सातारा प्रवाशांची जीपमधून ने आण करतो. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पंचपाळी हौद, राजवाडा सातारा येथे वडाप जिप लावण्याच्या कारणावरून बाळासाहेब विष्णु मोरे रा. कारी, ता. सातारा या दुसर्‍या डाप जीपचालक आणि अरुण गजानन मोरे यांच्या प्रवाशी घेण्यावरून वाद झाला. वाद सुरू असतानाच बाळासाहेब मोरे यांनी अरुण गजानन मोरे याच्यावर चाकूने वार केले. अरुण मोरे याने दोन्ही हात पुढे केल्याने दोन्ही हातांवर वार झाले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान बाळासाहेब मोरे हा तेथून निघून गेला. जखमी अवस्थेत अरुण मोरे वडाप जीप चालवत जिल्हा रुग्णालयाकडे येत असताना सिटी पोस्टा समोर तो बेशुद्ध पडला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन त्याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बाळासाहेब विष्णु मोरे हा सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.