Your Own Digital Platform

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन...

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले,उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आदिंनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आधुनिक महाराष्ट्राच्या कृषि-औद्योगिक विकासाचा पाया रचणार्‍या यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त कराड येथे प्रीतिसंगमावर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खासदार शरद पवार. समवेत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील व मान्यवर.