Your Own Digital Platform

दिलीपसिंह भोसले ‘आदर्श सहकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित

स्थैर्य, फलटण : ’आदर्श सहकार रत्न’ पुरस्कार स्विकारताना दिलीपसिंह भोसले. समवेत तुषार गांधी, राजाराम फणसे, संदीप जगताप व मान्यवर.

स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन, सांगली. यांच्यावतीने फलटण येथील श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांना ’आदर्श सहकार रत्न’ पुरस्काराने अलिबाग रायगड येथे सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या उपक्रमशील संस्थेच्या वतीने अलिबाग येथे दि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय 16 वा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. वृत्तपत्रातून प्राप्त झालेल्या कार्याची तसेच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांकडून उपलब्ध झालेल्या माहितीद्वारे विधायक क्षेत्रातील गौरवपूर्ण कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो. समाज हितैषी कार्याची समाजाला ओळख हवी व त्याद्वारे समाज घटकांना प्रेरणा मिळावी अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ मिळावे हा या पुरस्काराचा हेतू असतो.

दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर एकूण 17 संस्था कार्यरत असून त्या प्रगतिपथावर आहेत. संस्थांच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यात विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्रीडा आदी उपक्रम उत्साहात राबवले जातात. अलिबाग, रायगड येथील पी.एन.पी. नाट्यगृहात डॉ. जयप्रकाश घुमटकर, सांस्कृतिक कला मंडळ अलिबागच्या अध्यक्षा सौ चित्रलेखा ताई पाटील ,यशराज प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते ,भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई , संस्थेचे अध्यक्ष राजीव लोहार, मनिषाताई लोहार, निवड समितीच्या अध्यक्षा डॉक्टर मुग्धा रेठरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री भोसले यांना आदर्श सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सद्गुरु पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम फणसे ,सद्गुरु गृहतारण संस्थेचे अध्यक्ष तुषार भाई गांधी, सद्गुरु व महाराज या उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप आदी मान्यवर संस्था समूहाच्या वतीने या समारंभास उपस्थित होत.