लाच स्वीकारताना वनपाल जाळ्यात


स्थैर्य, सातारा : सातारा साग लाकडाची बदली वाहतूक करण्यासंदर्भात बदली पास मिळवण्यासाठी वनपाल शंकर जगन्नाथ आवळे राहणार रघुनाथपुरा पेठ करंजे सातारा यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली परंतु तडजोडी अंती ती रक्कम 14,000 रुपये ठरवण्यात आली परंतु ही रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले 

यातील तक्रारदार यांचा किरकोळ वखारी चा व्यवसाय असून त्यांच्या कडे असलेल्या साग या लाकडाचे मालाचा बदली वाहतूक पास दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने लाचेची मागणी करून ती स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले.

No comments

Powered by Blogger.