Your Own Digital Platform

‘ब्रिलीयंट’च्या यशराज यादवचे तालुकास्तरीय गोळाफेक स्पर्धेत यश


स्थैर्य, फलटण : फलटण येथील ब्रिलियंट अ‍ॅकॅडमी स्कूलचा विद्यार्थी यशराज रविंद्र यादव या विद्यार्थ्यांनी गोळाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
 
नुकत्याच तालुकास्तरीय 14 वर्षाखालील वयोगटात गोळाफेक स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेत यादव यांनी तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी कामगिरी संपादन केली. या विद्यार्थ्यास क्रीडा शिक्षक संदीप ढेंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
क्रीडा शिक्षक व खेळाडूचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, सचिव रणजितसिंह भोसले, प्रशासकीय अधिकारी सौ प्रियदर्शनी भोसले ,सर्व संचालक ,मुख्याध्यापक प्रफुल्ल अडागळे विभाग प्रमुख हेमलता बनकर शिक्षक पालक विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले.