Your Own Digital Platform

फलटण येथे संन्यास दीक्षा विधी समारंभाचे आयोजन


स्थैर्य, फलटण : परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीचक्रपाणी प्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या व महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्रीक्षेत्र फलटण येथे श्रीकृष्ण सेवा आश्रम यांच्यावतीने शनिवार दि. 23 व रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी संन्यास दीक्षा विधी समारंभाचे आयोजन गोकुळनगर (फरांदवाडी) ता. फलटण येथे करण्यात आल्याची माहिती संयोजक यांनी दिली आहे. श्रीचक्रथर स्वामी यांचे फलटण शहर व परिसरात काहीकाळ वास्तव होते. फलटण शहरांमध्ये महानुभाव पंथाची 6/7 मंदिरे आहेत. श्रीचक्रधर स्वामीचे जीवोध्दारक असलेल्या ब्रह्मविद्या शास्त्राला अनुसरून धर्मकुमारी सिमा लक्ष्मण बोडके ( एम. ए. बी.सी.ए.) ही ज्ञानार्जन करून संन्यास धर्मात पदार्पण करीत आहे. संन्यास दीक्षा विधी समारंभास महानुभाव मठ करंजे, सातारा येथील शास्त्रनिमित्त आचार्य प.पू.प.म. श्री. सातारकरबाबा महानुभाव, धमसंवर्धक पू.त. शकुंतलाबाई विद्वांस हे उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीपंचावतार उपहार, सायंकाळी 4 वाजता फलटण शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रविवार दि.24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता श्रीमुर्तीस मंगल अभिषेक, सकाळी 7 वाजता श्रीमद्वद्रीता पारायण, सकाळी 9 वाजता ध्वजारोहण, सकाळी 9.15 ते दुपारी 12 वाजता सभामंडप उद्घाटन, दीपप्रज्वलन, धर्मसभा, दीक्षा विधी सोहळा व मान्यवर यांचे अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शन होणार आहे. दुपारी 12.30 वाजता आरती, महाप्रसाद होणार आहे. संन्यास दीक्षा विधी समारंभाचे आयोजन श्रीकृष्ण देवन्स्थान टस्टचे उपाध्यक्ष प.पू.प.म.श्री. सुदामराजबाबा विद्वांस, घर्मकुमार राहुल विद्धांस यांच्यावतीने करण्यात आले असून या कार्यक्रमास फलटण निवासी सर्व संत,महंत,तपस्विनी व पंचक्रोशी तथा जिल्ह्यातील सद्भक्त वासनिक परिवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.