Your Own Digital Platform

आदर्की बु.॥ येथे उद्या श्री भैरवनाथ रथोत्सवाचा मुख्य दिवसस्थैर्य, फलटण : आदर्की बु.॥, ता.फलटण येथे श्री भैरवनाथ रथोत्सवास सुरुवात झाली असून उद्या मंगळवार, दि.19 रोजी रथोत्सवाचा मुख्य दिवस आहे. मंगळवार दि. 19 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. भाऊसाहेब पन्हाळकर शेवगाव यांचे कालभैरव जन्मोत्सव कितन होणार आहे. दुपारी 12 ते 12.30 या कालावधीमध्ये श्री भैरवनाथ जन्मोत्सव व दुपारी 1 वाजता महाप्रसाद. दुपारी 3 वाजता श्री भैरवनाथ यांची रथामधून गावातून ग्रामप्रदक्षिणा व मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री भैरवनाथ जयंती उत्सवामध्ये आदर्की परिसरातील भाविक भक्ती, महिला, तरुण, वृध्द यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून जयंती उत्सव यशस्वी करावा असे आवाहन श्री भैरवनाथ जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.