कराडात महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग उपक्रम


स्थैर्य, कराड : नगरपरिषदेच्यावतीने महिला व बालकल्याण समितीच्या मार्फत कराडमधील चारशे महिलांना दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दत्त चौकात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, गट नेते राजेंद्रसिंह यादव यांच्पा हस्ते झाला.

कराड शहराबरोबरच परिसरातील महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण मोफत देणार देण्यात येणार असून ड्रायव्हिंग पूर्ण झाल्यानंतर लायसन्सही त्यांना देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 
दोनशे महिलांना दुचाकीचे तर दोनशे महिलांना चार चाकी गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी येणारा खर्च कराड नगरपालिका करणार आहे.
 
महिलांचा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून गरज भासल्यास प्रशिक्षणात आणखी महिलांचा सहभाग वाढवणार असल्याचे सांगण्यात आले.

बांधकाम सभापती हणमंत पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बाळासाहेब यादव यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.