Your Own Digital Platform

कु.वैष्णवी निंबाळकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


स्थैर्य, फलटण : फलटण येथील ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी विनोद निंबाळकर हिची राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने औरंगाबाद येथे सब जूनियर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा संघ सहभागी झाला होता यामध्ये ब्रिलियंट अकॅडमी ची विद्यार्थिनी वैष्णवी निंबाळकर हिने यशस्वी अशी कामगिरी नोंदवली तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले ,सचिव रणजितसिंह भोसले ,प्रशासकीय अधिकारी सौ प्रियदर्शनी भोसले ,सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल अडागळे, विभाग प्रमुख सौ हेमलता बनकर, शिक्षक-पालक आदींनी अभिनंदन केले या स्पर्धेसाठी क्रीडाशिक्षक संदीप ढेंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.