Your Own Digital Platform

मोर्वे येथे गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन


स्थैर्य, फलटण : श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे, ता. खंडाळा येथे गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक/सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील यांचे ’जगा व आनंदी जगूया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच दिवशी सकाळी मोफत सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये नामवंत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. यावेळी एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे यांचेवतीने मोतीबिंदू, काचबिंदू, लेन्ससहित बिगर टाक्याची मोफत नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी अल्पदरामध्ये चष्म्याचेही वाटप केले जाणार आहे. या व्यतिरिक्त पहाटे श्री दत्तगुरु व सदगुरु चिले महाराज यांच्या मुर्तीला महाअभिषेक व रुद्र अभिषेक होणार आहे व दिवसभर अन्य धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या आरोग्य शिबीरामध्ये गरजूंनी व धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे यांचेवतीने करण्यात आले आहे.