Your Own Digital Platform

पोवई नाक्यावरील वाहतूक बदल एका दिवसापुरताच

स्थैर्य, सातारा : नागरिकांच्या तक्रारीनंतर पोवईनाक्यावरील बॅरिकेट्स वाहतूक शाखेने हटवले. 

स्थैर्य, सातारा : सातारा शहरात पोवई नाका परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्यात आले आहे. हे काम सुरु असताना वाहतूकीची कोंडी होवू नये व कामास अडथळा ठरु नये याकरता वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी पाहणी करुन प्रायोगिक तत्वावर वाहतूकीत बदल केला होता. परंतु करण्यात आलेल्या बदलामुळे वाहतूकीची केंडी झाली नव्हती. मात्र, साताकरांच्या तक्रारीमुळे सायंकाळी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

पोवई नाका परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी अभ्यास करुन वाहतूकीत बदल करण्याच्या सुचना दिल्या गेल्या. त्यानुसार बुधवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. तहसीलकार्यालयाकडून नाक्यावर जाणारी वाहने ही सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला वळसा मारुन कास रस्ता आणि पोलीस मुखालय मार्गाकडे सोडण्यात येत होती. तर पोलीस मुख्यालय मार्गाकडून जाणारी वाहने ही सरळ न जाता ती वाहने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास वळसा मारुन पुढे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुन्हा कास रस्त्याकडे वळवण्यात आली होती. यामुळे वाढलेल्या अपघाताच्या शक्यतेबरोबर वाहतूक सुरळीत सुरु झाली होती. परंतु हा प्रयोग साताकरांच्या पचनी पडला नाही. त्यांनी तक्रारी केल्यामुळे वाहतूक शाखेने सायंकाळी लावलेले बॅरिकेट हटवण्यात आल्याचे समजते.