Your Own Digital Platform

राममंदिर गगनचुंबी होणार: अमित शहास्थैर्य, लातेहार (वृत्तसंस्था): झारखंडमध्ये सत्ता स्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे. झारखंडमधील निवडणूक प्रचाराचा त्यांच्याकडून प्रारंभ करण्यात आला. झारखंडमधील लातेहार येथे अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच आता गगनचुंबी भव्य असे राम मंदिर होईल, असेही शाह यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले की, काँग्रेसकडून अयोध्या प्रकरणात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. मात्र सुप्रीम कोर्टाकडून अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देण्यात आला. कोर्टाच्या या निर्णयानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचा रस्ता मोकळा झाला आहे, असे देखील अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आले. 

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले की, मतांच्या अमिषासाठी काँग्रेसकडून हा निर्णय गेल्या 70 वर्षापासून ताटकळत ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या माथ्यावर असलेला कलम 370 चा कलंक पुसला आणि काश्मीरच्या विकासाचे रस्ते खुले केले. सरकार स्थापनेनंतर पहिल्याच सत्रात काश्मीरमधून कलम 370 आणि 35अ काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून करण्यात आल्याचे यावेळी अमित शहा यांनी सांगितले.

राम मंदिरच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्ला
अयोध्या प्रकरणावरुन अमित शहा म्हणाले की, प्रत्येकाला वाटते की अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे मात्र काँग्रेस पक्ष ही केसच चालू देत नव्हते. एवढ्या वर्षात या प्रकरणाचा निकाल लागत नव्हता. आम्हाला देखील वाटत होते की, कायदेशीररित्या या प्रकरणाचा निकाला लागावा. आणि आता श्रीराम कृपेने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यामुळे अयोध्येत आता त्याठिकाणी भव्य असे राम मंदिर बांधण्याचे सर्व रास्ते मोकळे झाले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे. जेथे राम ललाचा जन्म झाला त्याचठिकाणी आता राम मंदिर बांधले जाणार असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.