Your Own Digital Platform

विनापरवाना वाळू नेणार्‍यांवर गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा: तासगाव ता सातारा येथे नदीपात्रातून पाऊणं ब्रास वाळू विनापरवाना घेऊन जाणार्‍या तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलं झाला आहे. 

महसूल विभागाचे कर्मचारी संतोष शिवाजी झनकर यांनी फिर्याद दिली आहे . दि18 रोजी तासगावातून नदीपात्राकडे जाणार्‍या राच्या लगत तीन अज्ञात इसमांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून साडेचार हजार रुपये किंमतीची पाऊण ब्रास चोरून नेली. महसूल विभागाने पंचनामा करून त्याआधारे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार सावंत अधिक तपास करत आहेत.