Your Own Digital Platform

‘बिबी’तून दारुचा बेकायदा साठा जप्त


स्थैर्य, फलटण : बीबी ता. फलटण, मोरेवाडी फाटा येथील शिवतेज हॉटेल वर पोलिसांनी छापा टाकून 60 हजार रुपये किमती ची बेकायदा साठा केलेली विदेशी दारु व बिअर जप्त केली. आरोपी महेंद्र काकडे वय 42 राहणार बीबी रावसाहेब बोबडे राहणार बीबी यांच्याकडे 60हजार 738 रुपये किमतीचा दारू साठा आढळला. यांच्यावर 353 कलम 65 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.