Your Own Digital Platform

नाशिक येथे खेळाडूंच्या गाडीला अपघात; सहा जखमी

स्थैर्य, नाशिक : अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा अलगुण (जि. नाशिक) येथील खेळाडू राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेकरिता नाशिकवरून अमरावती येथे चारचाकीने (एमएच 15, जीआर 9958) जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकचालकाचे (जीजे 25, यू 4708) नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनावर धडकला. अपघातात शिक्षक एम. डी. पवार, टी. आर. गावित यांच्यासह विद्यार्थी कल्पेश सहारे, रोशन गायकवाड, प्रभाकर धूम व चालक सुरेश गावित गंभीर जखमी झाले. यामध्ये चारचाकीचा चालक जखमी सुरेश गावित हा कॅबिनमध्येच दीड तास अडकून होता

नाशिक : नाशिक येथील खेळाडूंना घेऊन जात असलेली क्लूजिर व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन खेळाडू, दोन शिक्षक व चालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. 27) दुपारी चारला अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील वाशिंबाजवळ घडली. अपघातानंतर चालक दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये अडकून होता. दरम्यान, पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यास बाहेर काढले.
 
असा घडला अपघात... जिल्ह्यातील खेळाडूंसह सहा जखमी 

पोलिसांनी सांगितले, की अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा अलगुण (जि. नाशिक) येथील खेळाडू राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेकरिता नाशिकवरून अमरावती येथे चारचाकीने (एमएच 15, जीआर 9958) जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकचालकाचे (जीजे 25, यू 4708) नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहनावर धडकला. अपघातात शिक्षक एम. डी. पवार, टी. आर. गावित यांच्यासह विद्यार्थी कल्पेश सहारे, रोशन गायकवाड, प्रभाकर धूम व चालक सुरेश गावित गंभीर जखमी झाले. यामध्ये चारचाकीचा चालक जखमी सुरेश गावित हा कॅबिनमध्येच दीड तास अडकून होता. घटनेची माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना मिळताच त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह धाव घेतली. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

महामार्गावरील वाहतूक विस्कळित

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. चारचाकीमध्ये शिक्षक एम. डी. पवार, टी. आर. गावित यांच्यासह कल्पेश सहारे, रोशन गायकवाड, प्रभाकर धूम, रोशन सहारे, चेतन चौधरी, मच्छिंद्र वाघमारे, चिंतामण चौधरी, उत्तम गवळी, श्याडम गायकवाड, कौशल चौधरी, किरण जाधव, मनीषा राथड हे प्रवास करीत होते. 

राज्यस्तरीय स्पर्धेत संघ होणार सहभागीअपघाताची माहिती मिळताच जिल्हा खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस मंदार देशमुख व अन्य सहकारी अपघातग्रस्त खेळाडूंच्या मदतीला धावून गेले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना, अन्य जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आला. दरम्यान, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री. देशमुख हे खेळाडूंसमवेत बुधवारी (ता. 27) उशिरा अमरावतीसाठी रवाना झाले. दोघे जण जखमी असल्याने दहा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.