Your Own Digital Platform

सांगवीतून दोन शेळ्यांची चोरी


स्थैर्य, फलटण : सांगवी (ता.फलटण) गावच्या हद्दीतील मोहितेवस्तीतून दोन शेळ्या चोरीस गेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.
 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार, दि.24 रोजी रात्री 11 ते दि.सोमवार, दि.25 रोजी रात्री 2:15 च्या सुमारास मौजे सांगवी (मोहितेवस्ती) गावचे हद्दीत फिर्यादी विशाल नाना शेगर यांच्या घराजवळ तारेच्या कंपाऊंडमधून आठ हजार किमतीच्या एक ते दीड वर्ष वयाच्या दोन शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.
 
सदर गुन्ह्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कर्णे करत आहेत.