Your Own Digital Platform

या नेत्यांना राजकीय घडामोडी नंतर सोडावे लागेल पद?


महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदलून गेले आहे. त्याचा जास्त परिणाम सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बाबत दिसून आला आहे. तर काहीं दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना पद सोडावे लागणार आहे ?यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगर पंचायत मधील पदांचा समावेश आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे.

सातारा जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण,आ जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण व सेनेचे शँभूराज देसाई हे पुन्हा निवडून आले आहेत.तर कोरेगाव येथील सेनेचे महेश शिंदे यांनी विधानसभेत पहिल्यांदा बाजी मारली आहे.गेली पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. त्याचा फटका दिग्गजांना बसला आहे. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी काही नेत्यांना जमिनीवर आणण्याची क्रांती घडवून आणली आहे.त्याचे सर्वांनीच आपापल्या परीने विश्लेषण केले आहे.

भाजप-सेनेच्या युती काळात कराडचे सहकार परिषेदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माथाडी कामगार नेते व आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व पश्चिम महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.तसेच केंद्र व राज्य आणि जिल्हा पातळीवर काही कार्यकर्त्यांची वर्णी लागली होती. काहींच्या नियुक्तीची चेष्टा झाली होती तर काहींना शेवट पर्यंत पत्र प्राप्त झाले नाही हा भाग सोडला तर अनेकांना पाच वर्षे झुलवत ठेवण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा घोळ मिटत नसल्याने राजकीय पक्षांतील नाराज मंडळी आता ’’’कसं वाटतंय,,,असे उघडपणे बोलू लागले आहे.

रुबाब दाखविण्यासाठी काहींना पदाची गरज असते तर काही जण कर्तबगारी दाखवून आपले महत्व पटवून देतात. आता राजकीय खांदे पालट होण्याची चिन्ह निर्माण झाली असून अनेकांना जिल्हा परिषद पासून ते गाव पातळी पर्यंत पद सोडावे लागणार आहे. याचा जास्त फटका माण-खटाव, सातारा-जावळी व कोरेगाव मतदारसंघात बसणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता अनेकजण पद वाचविण्यासाठी दोन्ही गडावर हात ठेवून नेत्यांच्या रोप व्हये ने मुदतीचा टप्प्या ओलडण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. याचा आता पक्ष नेत्यांनी विचार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.पुढील वर्षी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत बदल अपेक्षित असून कराड, खंडाळा, महाबळेश्वर, माण या तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली आहे.

(अजित जगताप)