Your Own Digital Platform

शहिद ओंबळे यांचे केंडबतील स्मारक रखडले


स्थैर्य, सातारा : अठरा वर्षापूर्वी पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेच्या बारा अतिरेक्यांनी सागरी मार्गी मुबंईवर हा हल्ला केला. 

या हल्हयातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडून शहिद झालेले मुबंई पोलिस दलातील सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र देण्यात आले असले तरी त्यांचे केडंबे ता. जावली येथील शहिद स्मारक इच्छा शक्तीच्या अभावी रखडले आहेत. हे स्मारक केव्हा पूर्ण होईल? याची अनेकांना प्रतिक्षा लागलेली आहे.
 
केडंबे येथून नोकरी व्यवसायासाठी मुबंईत आलेल्या तुकाराम ओंबळे यांनी 1979 साली मुबंई पोलीस दलात शिपाई म्हणून आपली सेवा सुरु केली होती. सहा. फौजदार बढती मिळाल्यानंतर त्यांची गिरगाव चौपाटी या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. रात्री 8.30 वा. वायरलेस मेसेज आल्यामुळे ओंबळे तातडीने वाहतूक व्यवस्था पाहू लागले. रात्री 9.30 च्या सुमारास स्कोडा गाडीतून अतिरेकी अजल कसाब हा मुबंईच्या दिशेने निघाला होता.तो चालवत असलेली गाडी थांबवून त्याला जिरेबंद करताना शहिद ओंबळे यांच्या देहाची चाळण झाली. पण त्यांनी अजमल कसाबला जावून दिले नाही. त्याला घट्ट मिठी मारली होती. या प्रसंगानंतर चित्रपट निघाले जगभराच्या प्रसार माध्यमातून दखल घेतली होती. गिरगाव चौपाटीवर शहिद ओंबळे यांचे उचित स्मारक बांधण्यात आले आहे. पण दुर्दवाने त्यांचे मूळ गाव असलेल्या केडंबे, ता. जावली येथील स्मारक जागेचा वाद मिटू शकला नाही.अशी माहिती पुढे आली आहे.
 
राज्याचे तात्कालीन उपमुख्यमंत्री, पालक मंत्री तसेच आमदार, खासदारांनी या गावाला भेट देवून स्मारक लवकरच पूर्ण होईल असे सदाकाळ चालणारे वाक्य ग्रामस्थांना ऐकवून आपल्या कार्याची चूणूक दाखवली होती. आजही ती चूणूक काय आहे. काहींनी पक्ष बदलला, निष्ठा बदलली ,आता तर शहिद ओबंळे यांचे स्मारक नेमके कोण बनवणार? याची सर्वांनाच उस्तुकता लागलेली आहे. शहीद ओंबळे यांचे कुटुंब मुबंई तील वरळीगाव येथे राहत असून शहिद ओंबळेचे स्मारक केडंब्यात व्हावे असे त्यांची मनस्वी इच्छा आहे. पण ती इच्छा अद्यापही पूर्ण होवू शकली नाही. 

सदरचे स्मारक पूर्ण करण्यासाठी आता जावलीकरांनीच पूढाकार घ्यावा यासाठी एक व्यापक आंदोलन उभारण्याची गरज आहे असे मत साामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद जगताप, सेवा निवृत प्राध्यापक तुकाराम ओंबळे व संदिप गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. यासाठी सर्व पक्षीय नेत्यांना भेटण्याची तय्यारी करण्यात आली आहे असे समजते.