Your Own Digital Platform

धावण्याने वाढते आयुष्य


शरीरातील प्रत्येक यंत्रणेत होते सुधारणा, रक्तदाबही होतो कमी, मेंदूही संतुलित राहतो नव्या संशोधनातून हे समोर आले आहे की, अगदी थोडावेळ जरी धावण्यानेही अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील यंत्रणा सुधारणा होते. न धावणार्‍यांपेक्षा नित्यनेमाने धावणार्‍यांमध्ये कोणत्याही रोगाने मृत्यू पावणार्‍यांचे प्रमाण 27% पेक्षा कमी असते. तर त्यांच्यात हृदविकाराचे प्रमाण 30% आणि कर्करोगाने जीव जाणार्‍यांचे प्रमाण 23% पेक्षा कमी असते. 14 प्रकारच्या विविध निरीक्षणातून ही माहिती समोर आलेली आहे. संशोधकांनी मागील पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अमेरिका, डन्मार्क, ब्रिटन आणि चीन च्या दोन लाख 32 हजारांहून अधिक मृत्यूंचा सखोल अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेले आहेत. या विश्लेषणावेळी लोकांची विविध गटात विभागणी केली होती. दर आठवड्याला 50 मिनीटांपेक्षा कमी धावणार्‍यांना एका गटात ठेवण्यात आले. व्हीक्टोरिया यूनिवर्सिटी, आस्ट्रेलियातील हेल्थ आणि स्पोर्ट इन्स्टीट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक जेल्जको पेडिसिक यांचे म्हणणे आहे की, तुम्ही किती धावता यामुळे फरक पडत नाही, कारण धावण्याने फायदाच होतो. जेल्जको हे ब्रिटिश स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित नव्या विश्लेषणात्मक लेखकातील एका आहेत. आणखी एका नव्या संशोधनात सहभागी हार्वर्ड यूनिवर्सिटीचे मानव जीवशास्त्राचे प्राध्यापक डेनियल लीबरमॅन यांच्या म्हणण्यानुसार, मानवाची शारीरिक रचना धावण्यासाठीच बनवली आहे. मानवाला आता त्याच्या भोजनासाठी व त्या शिकारीसाठी धावावे लागत नाही. परंतू, धावण्याने अस्तित्व राखून ठेवण्यास मदत होते व तब्येतही नीट राहते. डॉक्टरांपासून दूर राहण्यासाठी धावणे हा उत्तम पर्याय आहे. ते म्हणतात, धावण्याने हृदयाचे काम करण्याची क्षमता वाढते. छोट्या धमण्यांची संस्खा वाढल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब हा शारीरीक व्याधी व मृत्यूचे प्रमुख कारण आहे. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी धावणे हा उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. या साखरेवर अवलंबून असणार्‍या कर्करोगाच्या पेशी उपाशी राहातात. शरीराच्या विविध भागात सुज आल्याने काही आजार जडू शकतात, ही सूज धावण्याने कमी होते. तसेच मेंदूला आवश्यक असणार्‍या प्रोटीनचे प्रमाणही यामुळे वाढते व वृद्धापकाळी उद्भवणार्‍या अल्जायमरपासून ही बचाव होतो. 

संशोधन असेही सांगते की, आठवड्याचे 50 मिनीट धावणे म्हणजे अकाली मृत्यूच्याविरोधातील बचावाचा उपाय. सारखे धावणे ही योग्य नाही.