Your Own Digital Platform

गावाला अभिमान वाटावा असे करून दाखवू या

स्थैर्य, गोखळी : येथील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये जमलेली वार्डसभा.

वॉर्डसभेत ग्रामस्थांनी केला संकल्प; गोखळीत जिल्ह्यातील पहिली वॉर्डसभा

स्थैर्य, गोखळी : ग्रामपंचायतीकडून विकासाच्या फक्त अपेक्षा नको,तर त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीत सहभाग होऊ या. प्रत्येक नागरिकांनी वार्डाबरोबर गावाच्या विकासावर नुसते बोलणारे,अपेक्षा करणारे नकोत प्रत्यक्ष सक्रिय योगदान देणारे हवेत.गावाला अभिमान वाटेल असा वार्डाचा सर्वोत्तम विकास करुन दाखवू या,असे संकल्प गोखळी गावातील वार्ड 4 मधील नागरिकांनी केला.

ग्रामपंचायतीच्या कायदातील तरतुदीनुसार प्रत्येक सदस्यांने वार्ड सभा घेणे, हे बंधनकारक आहे. वाँर्डसभा घेणे हे सदस्यांचे कर्तव्य असून यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज आणि विकास अधिक प्रभावीपणे होऊ शकते.गोखळीग्रामपंचायतीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच ’ग्रामपंचायत आपल्या दारी’ संकल्पनेतून वार्ड क्रमांक 4 मध्ये वार्ड सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच निलेश घाडगे होते तर यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे,सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच बाळासाहेब आटोळे, सदस्य निलेश घाडगे,योगेश गावडे, शांताराम गावडे, राधेश्याम जाधव, योगेश गावडे, अमित गावडे,अभिजित जगताप, सागर गावडे- पाटील ग्रामविस्तार अधिकारी दडस, कर्मचारी,वार्ड मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे महत्व प्रस्तावना राधेश्याम जाधव यांनी केली.यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती,विकासाचे नियोजन, अंदाजपत्रक ,वसुलीबाबतीत माहिती सांगून ग्रामपंचायत कशी चालते,याची सविस्तर माहिती ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी दिली. यावेळी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. हनुमंत घाडगे यांनी आभार मानले. ग्रामपंचायत पातळीवर वार्ड सभा घेणे बंधनकारक असले तरी सहसा या सभा होत नाहीत. मात्र गोखळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुमनताई गावडे आणि सर्व सदस्यांनी मनाशी निश्चय करून वार्ड सभा नियोजन केले. वार्ड क्रमांक 4 मधील लोहारवस्ती,घाडगेवस्ती येथील नागरिकांच्या सोयीस्कर सायंकाळी सात व आठ वाजण्याच्या सुमारास या सभा आयोजित करण्यात आल्या. खेड्यात शेतकरी शेतमजूर कष्टकरी वर्ग जास्त प्रमाणात असतो. त्यांच्या सोयीनुसार वार्ड सभा घेऊन नवा इतिहास घडविला. या सभांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. गावला अभिमान वाटेल असा आपल्या वार्ड क्र 4 चा विकास करून दाखया असा संकल्प गोखळी वार्ड क्र 4 मधील नागरीकांनी केला.वार्ड क्र 4 मधील नागरीकांचा संकल्प जिल्ह्याला प्रेरणादायी असाच आहे.