Your Own Digital Platform

हे संधीसाधूंच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण: नितीन गडकरी


तर, महाराष्ट्रात अस्थिरता येईल

स्थैर्य, नवी दिल्ली: एकीकडे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या बैठका सुरु आहेत. चर्चा निर्णायक टप्प्यावर आली असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले. गडकरी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार टीकणार नाही. भाजप शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र, महाराष्ट्रात होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या पक्षांमध्ये ताळमेळ नाही. काँग्रसने शिवसेनेच्या विचारधारेचा कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस विचारधारेचा शिवसेनेने कायमच विरोध केला आहे. विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारे ही महाविकास आघाडी झालेली नाही. ही फक्त संधी साधू आघाडी आहे. त्यामुळेच ही महाविकास आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगलं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.