Your Own Digital Platform

श्रीराम रथोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम


स्थैर्य, फलटण: फलटण नगरीचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम रथोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. शुक्रवार, दि.22 रोजी सायं 5 ते 7 किर्तन, रात्री 9 ते 11 प्रभावळ वाहन. दि.23 रोजी सायं.5 ते 7 किर्तन, रात्री 9 ते 11 अंबारी वाहन. दि.24 रोजी सायं.5 ते 7 किर्तन, रात्री 9 ते 11 शेषाचे वाहन. दि.25 रोजी साय.5 ते 7 किर्तन, रात्री 9 ते 11 गरुडाचे वाहन. दि.26 रोजी स.9 ते 11 श्रीराम प्रभुंचे रथास 11 ब्राह्मणांचा लघुरुद्राभिषेक होवून दुपारी 2 नंतर रथास पोषाख. सायं.5 ते 7 र्कितन, रात्री 9 ते 11 मारुतीचे वाहन. दि.27 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत श्रीराम मंदिरात किर्तन होवून ’श्रीं’च्या मुर्ती सकाळी 8 वाजता श्रीराम प्रभुंचे रथात बसवून रथ दिवसभर फलटण शहरात मिरवणूकीने फिरुन सायंकाळी 7 वाजता परत श्रीराम मंदिरात येईल. रविवार, दिनांक 1 डिसेंबर रोजी ‘श्रीं’ची पाकळणी सकाळी काकडा आरती व किर्तन होवून नंतर श्रीरामास 11 ब्राह्मणांचा लघुरुद्राभिषेक व महापूजा होईल, अशी माहिती नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.