Your Own Digital Platform

विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती

स्थैर्य, कराड : उड्डाण पुलासाठी प्रार्थना करताना हजारो विद्यार्थी.

स्थैर्य, कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्यास कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. हा परिसरात मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळेच दोन वर्षापूर्वी मंजूर झालेल्या उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू व्हावे, सध्यस्थितीत एका लेनवर असलेल्या उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात यावी, या मागणीकडे शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी कराड तालुक्यात हजारो शालेय विद्यार्थ्यांनी कळकळची विनंतीची प्रार्थना केली.
 
पाच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय संघटना, पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित येत कोल्हापूर नाका उड्डाण पूल व्हावा, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
 
या समितीकडून शुक्रवारी तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती ही प्रार्थना म्हणत शासनासह प्रशासनाचे उड्डाण पुलाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कराडमधील शिवाजी विद्यालय, संत तुकाराम हायस्कूल, जनकल्याण प्रतिष्ठान संचलित शाळा, कराड नगरपालिकेच्या शाळा यामधील हजारो विद्यार्थ्यांनी कृती समितीकडून देण्यात आलेली कळकळीची विनंती ही प्रार्थना म्हटली आहे.
 
यापूर्वीच प्रांताधिकार्यांकसह पोलिस उपअधीक्षक यांनी उड्डाण पुलाच्या प्रश्नी सर्वपक्षीय कृती समितीला सहकार्य करू, अशी ग्वाही दिली आहे.