हॉटेलमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्त्या


स्थैर्य, फलटण : शहरातील मध्यवर्ती भागातील हॉटेलमध्ये तेवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर अहिवळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सागर युवराज अहिवळे वय 23 वर्ष राहणार मंगळवार पेठ फलटण याने ऋतुराज हॉटेलमधील रूम नंबर 207 मध्ये स्वतः पांढर्‍या रंगाचे बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत त्याचा चुलत भाऊ रोहित यशवंत अहिवळे राहणार मंगळवार पेठ यांने तक्रार दाखल केली असून पुढील प्राथमिक तपास पोलीस नाईक सुळ हे करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.