Your Own Digital Platform

गृह प्रकल्पांची महारेराकडे नोंद गरजेची


क्रेडाई महाराष्ट्रची स्वयं नियामक संस्था म्हणून निवड


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम व्यावसायीकांना आता आपले प्रचलीत व नवीन गृहप्रकल्प महारेराचे 1 नोव्हेंबर चे प्रसिद्धी पत्रकानुसार 1 डिसेंबर 2019 पासुन महारेरा अथोरीरीकडे नोंदणी करणेपुर्वी स्वयंनियामक संस्थेकडे नोंदणी करणे अनिवार्य व बंधनकारक केले आहे, आणि नुकतेच क्रेडाई महाराष्ट्र या आपले संस्थेला महाराष्ट्र राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्था म्हणुन मान्यता दिली आहे. ‘‘क्रेडाई महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित अशा 55 शहरांमध्ये आपल्या 26950 नामांकीत व कुशल सदस्यासह कार्यरत आहे. ‘क्रेडाई महाराष्ट्र’ म्हणजे कायदेशिर व लोकाभिमुख कामे करण्याबद्दल जनमानसामध्ये विश्वास संपादीत केलेली संघटना आहे. शासनासोबतचे बांधकाम क्षेत्रातील विविध धोरणे तयार करताना नेहमीच पुढाकार घेत असते.

‘‘क्रेडाई महाराष्ट्राने’’ आपले 55 शहरांमध्ये नुकतीच एक सभासदत्व नोंदणी प्रक्रीया सुरु केली आहे. त्या अनुशंगाने ‘‘क्रेडाई फलटण’’ ने आपले श्रीराम टॉवर्स येथील कार्यालयात सर्व सदस्यांची मिटींग आयोजित केली होती. त्यावेळी ‘‘क्रेडाई महाराष्ट्रा’’ चे मार्गदर्शनाखाली असा ठराव केला आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाईचे कायम सदस्यत्व घेतलेले नाही, त्यांच्यासाठी ‘‘क्रेडाई फलटण’’ तर्फे रेरा प्रोजेक्ट मेंबरशिप हा विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यात बांधकाम व्यावसायिकांना विशिष्ट गृहप्रकल्पापुरते नाममात्र फी भरुन सदस्यत्व घेता येणार असून त्यामुळे महारेरा नोंदणी करणे सोपे जाईल.

‘‘क्रेडाई फलटण’’ चे अध्यक्ष विजय जाधव यांनी यासंदर्भात फलटण शहर व आजुबाजुचे परिसरातील नगरपंचायती उदा. लोणंद, दहिवडी, म्हसवड, वडुज येथील सर्व बांधकाम व्यावसायीक या पर्यायाचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन केले आहे. त्यावेळी क्रेडाई वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जाधव, जावेद तांबोळी, क्रेडाई सेक्रेटरी अनिल निंबाळकर, रविकांत इंगवले, मंगेशशेठ दोशी, अ‍ॅड. शैलेंद्र शहा, उमेश निंबाळकर, राजीव निंबाळकर, दादासाहेब कदम, अशोक खलाटे, राजेंद्र निंबाळकर, तुषार निंबाळकर, अमोल खलाटे, प्रताप वाघ इत्यादी सदस्य उपस्थित होते.

क्रेडाई प्रोजेक्ट मेंबरशिप घेणारे सदस्यांना क्रेडाई फलटण मार्फत महारेरा संबंधीत, महारेरा कायदे विषयक, प्रकल्प नोंदणी करणे विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यामुळे त्या सदस्याला आपला गृहप्रकल्प क्रेडाई महाराष्ट्राचे आदर्श परंपरेनुसार, कायदेशिर व तांत्रिकद़ृष्ट्या सक्षमपणे प्रस्तावित करणे सोईचे व सुखकर होईल, तरी या योजनेचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त प्रकल्प धारकांनी अवश्य घ्यावा, असे क्रेडाई फलटण ने नमुद केले आहे.