राजधानीत पोस्टर; गौतम गंभीर बेपत्ता



माजी क्रिकेटर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर दिल्लीमध्ये वाढत्या प्रदुषणावर उपाय करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सामील न झाल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. आज(रविवार) दिल्लीमध्ये गौतम गंभीर बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरवर लिहील आहे, ’तुम्ही यांना पाहीलं का? इंदुरमध्ये जिलेबी खाताना शेवटचं दिसले होते. पूर्ण दिल्ली यांना शोधत आहे.’
 
गंभीर माग्या आठवड्यात इंदुरमध्ये झालेल्या भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यात कंमेट्री करायला गेले होते. शुक्रवारी व्हीव्हीएस लक्ष्मणने जतिन सप्रू आणि गंभीरसोबत पोहे आणि जिलेबी खातानाचा एक फोटो ट्वीट केला. त्यानंतर गंभीरला युजर्सनी ट्रोल करणे सुरू केले. तसेच, विरोधकांनीही त्याच्यावर टीकेची झोड उठवली.
 
त्यानंतर गंभीरने ट्वीट केले की, ’मला शिव्या दिल्याने दिल्लीतील प्रदुषण कमी होणार असेल, तर मला भरभरून शिव्या द्या. मी माझ्या मतदारंघासाठी आणि शहरासाठी मागील 6 महिन्यात खूप काम केलं आहे.’ यासोबत गंभीरने मागील सहा महिन्यात त्याने केलेल्या कामाची माहिती ट्विटरवरुन दिली.

No comments

Powered by Blogger.