Your Own Digital Platform

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न


स्थैर्य, फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा श्री सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिरात भाविक भक्ताच्या उपस्थीतीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री सद्गुरु हरिबुवा सांप्रदायिक भजनी मंडळांच्या वतीने भजन सेवा करण्यात आली. दुपारी बारा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय च्या जयघोषात पुष्पवृष्टी करण्यात येऊन आरती करण्यात आली.उपस्थीत भावीक - भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.