Your Own Digital Platform

दुकानाचे छप्पर उचकटून रोख रक्कम लंपास


स्थैर्य, फलटण : सुरवडी (ता.फलटण) येथील किराणा माल दुकानाचे छप्पर रात्रीच्या वेळी उचकटून चोरट्यांनी दुकानातील सुमारे 41 हजार 210 रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.
 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरवडी (ता.फलटण) येथील किराणा माल दुकानदार विक्रम छत्तशिंग भाडी यांचे सुरवडी गावात कमानीजवळ नवदुर्ग नावाचे किराणा माल दुकान आहे. रविवार, दि.24 रोजी रात्री 9 वाजता रोख रक्कम दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवून भाडी यांनी दुकान बंद केले.सोमवार, दि.25 रोजी सकाळी 7:30 वाजता दुकान उघडल्यावर दुकानावर छप्पर असलेला सिमेंटचा पत्रा फोडल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी ड्रॉवरमधील रोख रक्कम तपासली असता सदरची रक्कम ड्रॉवरमध्ये नसल्याचे आढळून आले.
 
याबाबतची फिर्याद विक्रम भाडी यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.