राजेंद्र भागवत ‘महात्मा फुले सत्यशोधक’ पुरस्काराने सन्मानित


स्थैर्य, फलटण : सृजन फौडेशन आदर्की (बु) ता. फलटण यांच्यावतीने खंडाळा येथे आयोजित कार्यक्रमात गोखळी ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र भागवत यांना ’महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल भागवत यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
 
गोखळी येथील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव होते. यावेळी अष्टविनायक ग्लास प्रा. लि.चे दीपक शिर्के, प्राचार्य मेजर थॉमस कॅन्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
राजेन्द्र भागवत यांचे कुटुंब महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार प्रसाराचे काम करत आहे. पोलीस उपनिरक्षक असलेला स्वत:चा मुलगा रुपेश याचा विवाह ’सत्य शोधक ’ पध्दतीने करुन स्वत:च्या घरापासूनच महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रचाराला भागवत कुटुंबीयांनी गती दिली. याची दखल घेऊन त्यांना महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
संस्थेच्यावतीने दीपक शिर्के,फलटणचे माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनाही महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
यावेळी अ‍ॅड. दिगंबर आलाट (पुणे), साथ फाऊंडेशनचे कय्यम मुल्ला, अनिल कुदळे, मंगेश माने, दशरथ ननवरे, सौ.प्रिया ननावरे, नितिन बिचुकले, युवराज जमदाडे, सोमनाथ खोमणे, सुशिल गायकवाड आदींची उपस्थिती होती.
 
सृजन फाऊंडेशन अध्यक्ष अजित जाधव यांनी प्रास्ताविक, जनार्धन गार्डे यांनी सूत्रसंचालन, संदीप ननवरे यांनी स्वागत केले.

No comments

Powered by Blogger.