Your Own Digital Platform

सातार्‍यात मधुरा वेलणकरसोबत गप्पांची मैफिल


स्थैर्य, सातारा : आपल्या सदाबहार अभियानानं सध्या रंगभूमी गाजवत असलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी नव्या इंनिगला सुरुवात केली आहे. त्यांचे नुकतेच ‘मधुरव’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्त मसाप, शाहुपुरी शाखा आणि सातारकरांची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक लि. यांच्यावतीने रविवार 24 नोव्हेंबर रोजी शाहूकलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता अभिनेत्री वेलणकर यांच्यासोबत गप्पांची मैफिलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात, कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभियन करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. ब्युटी विथ ब्रेन अभिनेत्री असलेल्या मधुरा वेलणकर या आता लेखकांच्या पंगतीत जाऊन बसल्या आहेत. त्यांनी स्वतःचे अनुभव ‘मधुरव’ या पुस्तकातून लिखित स्वरुपात मांडले आहेत. एका साप्ताहिकात लिहिलेल्या लेखाचं हे संग्रहरुप पुस्तक आहे. आतापर्यंत ‘सरीवर सरी’, ‘गोजिरी’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘पाऊलवाट’ अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांबरोबरच अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. यादरम्यान आलेले अनुभव या पुस्तकात मांडल्या आहेत. अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीबरोबर गप्पांची मैफिलीचे आयोजन मसाप, शाहुपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री वेलणकर यांच्याशी संवादक विनोद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. तसेच याप्रसंगी विधानसभेत सलग विजयाचा चौकार ठोकणा-या आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका जनता सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जनता सहकारी बँकेचे भागधारक पॅनेल प्रमुख, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, मसाप, शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाह अ‍ॅड. चंद्रकांत बेबले आणि बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे.