स्वत:साठी काढा काही मिनिटं


निरोगी आयुष्यासाठी मानसिक संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून पुढीलप्रमाणे काही मिनिटं काढली तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
0 3 मिनिटं- रात्री झोपण्या आधी तीन मिनिटं दिवसभरात घडलेल्या तीन चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि ते कुठे तरी नोंदवून ठेवा. यामुळे ताण हलका होण्यास मदत होते. 0 5 मिनिटं- एका अभ्यासानुसार सिद्ध झालं आहे की, हिरवळीच्या जागेत थोडा वेळ जरी व्यायाम केला तरी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे दररोद किमान 5 मिनिटं तरी हिरवळीत व्यायाम करा. 0 6 मिनिटं- परदेशातील एका नामांकित विद्यापीठानं काही लोकांची निरीक्षणं नोंदवली. यात काही मंडळींना तणावपूर्ण काम केल्यानंतर वाचन करणं, गाणी ऐकणं, व्हिडीओ गेम खेळणं, चहा-कॉफी पिणं, यापैकी एखादी गोष्ट करण्यास सांगण्यात आली. ज्यांनी वाचन करण्याला पसंती दिली त्यांचा ताण लगेच हलका झाला. त्यामुळे दिवसभरात किमान 6 मिनिटं वाचन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 0 25 मिनिटं- ध्यान लावून श्वासावर नियंत्रण मिळवल्यानं प्रसन्न वाटतं. तसंच भूतकाळाचा किंवा भविष्याचा ताण न घेता फक्त वर्तमानातील गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. 0 30 मिनिटं- नैराश्याचा परिणाम जसा मानसिक आरोग्यावर होतो तसा शरीरावर देखील होतो. यावर उपाय म्हणजे गरम पाण्यानं आंघोळ करणं. यामुळे फक्त शरीराला आराम मिळत नाही तर स्नायूंवरचा ताणही हलका होतो. 0 45 मिनिटं- आठवड्यातून किमान तीन-चार दिवस 45 मिनिटं व्यायाम केल्यानं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

No comments

Powered by Blogger.