Your Own Digital Platform

माणदेशी उद्योजिकांचा पुरस्कार वितरण समारंभस्थैर्य, सातारा : माणदेशी फौंडेशन आयोजित माणदेशी महोत्सव मध्ये माणदेशी उद्योजिकांचा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या माणदेशी उद्योजिका पुरस्काराचे वितरण सुप्रसिध्द सिने अभिनेत्री ऍर्श्वया नारकर तसेच लीड, ग्रॅण्ट्स ऑपरेशन कॉर्पोरेट सिटीझनशिप क्सेन्चर, इंडीयाचे डॉनियल थॉमस, लीड, प्रोबोनो कॉर्पोरेट सिटीझनशिप ?क्सेन्चर, इंडीयाचे सौम्या प्रकाश, नारीच्या चंदाती निबंकर, चार्ट्ड अकौंटंट उदय गुजर साहेब, माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, श्रीमती रेखा कुलकर्णी, श्रीमती वनिता शिंदे तसेच माणदेशी महिला बॅकेच्या संचालिका यांच्या उपस्थित झाले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन पाहूण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली या सर्व पाहुण्यांचे स्वागत पारंपारीक ढोल पथकाच्या गजरात झाले.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस 50 शालेय विद्यार्थींनीना सायकलीचे वाटप सिने अभिनेत्री ऍश्वर्या नारकर आणि उपस्थित पाहूणे यांच्या हस्ते झाले.ऍश्वर्या नारकर आणि उपस्थित पाहुण्यांनी माणदेशी महोत्सवात फिरुन महोत्सवामध्ये असलेल्या बारा बलुतेदारांचे प्रदर्शन आणि स्टॉल धारकांशी हितगुज केले.

माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून आपापले व्यवसाय करीत इतर महिलांनाही रोजगार मिळावून देणा-या श्रीमती सुनिता खटावकर, श्रीमती सारिका सिध्दनाथ, श्रीमती मल्लिका शिकलगार, श्रीमती पुजा चटप, श्रीमती श्रीमती जयंवती भोये, श्रीमती कौसर नद़ाफ, श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती प्रिया पतुरकर, श्रीमती तबस्सुम पठाण, श्रीमती वनिता सोनवणे, श्रीमती सुरेखा शेडगे, श्रीमती सुवर्णा मोरे, श्रीमती रुपाली मगर, श्रीमती सुनिता पवार, श्रीमती रोहिणी गरुड, श्रीमती रेश्मा चव्हाण, श्रीमती वनिता साळुंखे, श्रीमती कृष्णाबाई मुळे या माणदेशी उद्योजिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सिनेअभिनेत्री ऍश्वर्या नारकर यांनी या सर्व पुरस्कार विजेत्या महिलांना शुभेच्छा देताना म्हणाल्या, माझ्या आयुष्यातला हा खूपच महत्वाचा संस्मरणीय दिवस आहे असा संसार उभा करणे कठीण आहे या सर्व महिला उद्योजिकांना माझा मानाचा सलाम.तसेच यावेळी माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी सर्वांचे आभार मानताना मुलींच्या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.